विनया केसकर यांना पीएच. डी. पदवी प्रदान

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मराठी विषयात विनया केसकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. “आशा बगे व सानिया यांच्या कथांचा तुलनात्मक अभ्यास’ हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. केसकर यांना डॉ. आरती दातार यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या त्या भारतीय जैन संघटनेमध्ये “स्मार्ट गर्ल’ या युवती सक्षमीकरणाच्या प्रकल्पात काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)