पुणे- अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 15 दिवसांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी सुनावली.
संतोष आनंदा अफरांदे (27, रा. अफरांदे वस्ती, ता. शिरुर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना 11 जुलै 2015 रोजी घडली. अफरांदे याचे पीडित मुलीच्या घरासमोर किराणा मालाचे दुकान होते. तो त्याच्या दुकानाचा माल पीडितेच्या घरी साठवून ठेवत असे. त्यामुळे त्यांची ओळख होती. घटनेच्या दिवशी पीडित मुलीच्या घरी ती एकटी होती. तो जेवणाचा डबा घेऊन घरात घेला. तिचा विनयभंग केला. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने त्याला याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने असे काही, झाले नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी आरोपी विरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी तपास केला. त्यांना महिला पोलीस हवालदार पी. व्ही. भांड यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा