विनयभंगाचा गुन्हा रद्द करा नेस वाडीयाची हायकोर्टात याचिका 

नेस वाडियाने माफी मागितल्यास प्रिती गुन्हा मागे घेण्यास तयार, माफी मागण्यास वाडियाचा नकार 
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा चार वर्षापूर्वी विनयभंग केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करा. अशी विनंती करणारी याचिका नेस वाडिया यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेची सुनावणी 9 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी न्यायालयाने प्रिती आणि नेस या दोघांनाही न्यालयात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जर नेस वाडीया याने माफी मागितली तर आपण समझोता करण्यास तयारी प्रिती झिंटाने दर्शविली आहे .
आयपीएल क्रिकेट सामन्यात पंजाब किंग्ज इलेव्हन आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचा सामना 30 मे 2014 रोजी सुरू होता. त्यावेळी प्रिती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेले पाहून वाडीया याने तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर प्रितीने आपली जागा बदलली. पण तरीही नेस यांनी आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला.
मुंबई पोलिसांनी याची दखल घेऊन 00 पानी आरोपपत्र महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाखल केले आहे. हल्ला
करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणे, विनयभंग करण्याच्या गुन्ह्यांसह आरोपपत्र दाखल केले. हा गन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका नेस वाडीयाने उच्च न्यायालयात दाखल केली. प्रितीच्या वतीने जर नेस माफी मागण्यास तयार असेल तर खटला मागे घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र त्यास नेसच्यावतीने जोरदार आक्षेप घेतला गेला आणि केवळ माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठीच प्रितीने हा आरोप केल्याचा दावा केला. दोघांच्या या युक्तीवादानंतर न्यायालयाने यावर आता सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला दिला आणि 9 ऑक्‍टोबरला हजर रहाण्याचे आदेश दोघांनाही दिले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)