विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

पिंपरी – दुचाकीवरुन पाठलाग करुन 36 वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समीर राजकुमार महापुरे (वय-25, रा. मोशी, प्राधिकरण) असे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी, स्पाईन रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा समीर महापुरे हा मागील दीड महिन्यांपासून पाठलाग करुन विनयभंग करत होता. हा त्रास दिवसें-दिवस वाढतच चालल्याने संबंधित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)