विनयभंगप्रकरणी चौघांवर गुन्हा

सोमेश्‍वरनगर- सुपे (ता. बारामती) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात बाललैंगिक कायद्यान्वये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाळू लोणकर यांच्यासह सोबत इतर तीन व्यक्‍ती (नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यत आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या भावाने फिर्याद दिली आहे. याबबतची माहिती अशी की, बुधवारी (दि. 1) रात्री साडेअकराच्या सुमारास सुपा गावच्या हद्दीत एसटी बसस्थानकासमोर मनोज लोणकरने फिर्यादीच्या बहिणशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत फिर्यादी, फिर्यादीची आई, चुलत भाऊ यांनी मनोज लोणकर यास तू कोण आहेस असे म्हणत याचा जाब विचारला. यावेळी लोणकर व त्याच्याबरोबर असणाऱ्या तीन जणांनी फिर्यादिस मारहाण करीत शिवीगाळ, दमदाटी करून फिर्यादीची आई व बहीण यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक फौजदार के. बी. मोरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)