विनयभंगप्रकरणी कॅब चालकास अटक

पिंपरी – कॅब चालकाने प्रवासी तरुणीशी अश्‍लील संवाद साधून तिचा विनयभंग केला. ही घटना राधा चौक ते म्हाळुंगे गाव दरम्यान घडली. कॅब चालकाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या अर्जावरून मंगळवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार संतोष चंद्रकांत शेटे (वय-39, रा. शाहू कॉलेज रोड, पर्वती, दत्तवाडी, पुणे) असे कॅब चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला 5 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमार राधा चौकातून म्हाळुंगे येथे जायचे होते. त्यासाठी तिने आरोपीची कॅब (एमएच 12 / के एन 5937) बुक केली. कॅब मधून जात असताना आरोपी कॅब चालकाने तरुणीशी अश्‍लील शब्दात बोलून तिचा विनयभंग केला. यावरून तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)