विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

पिंपरी – इमारतीखाली उभे राहून महिलेचे नाव घेत अश्‍लील शब्दप्रयोग करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 9 ) चिंचवड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संतोष सुरेश गायकवाड ( रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाव आहे. या प्रकरणी पस्तीस वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन तू माझ्याशी का बोलत नाहीस असे विचारले. महिलेने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने महिलेच्या कानशिलात लगावली. तसेच जर तू बोलली नाहीस तर नवऱ्याला उलटसुलट सांगेन, अशी धमकी दिली. तरी देखील महिलेने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने इमारतीखाली उभे राहून महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असा शब्दप्रयोग केला. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)