‘विधी’साठी यंदापासून नवी नियमावली

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या उत्तीर्णासाठी सरासरी 50 टक्‍क्‍यांऐवजी आता सरसरकट 40 टक्‍के गुणांचा नियम केला आहे. प्रत्येक विषयात 40 गुण मिळाले तरी विधी अभ्यासक्रम उत्तीर्ण होऊ शकतो. या सुधारित नियमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2018-2019 च्या परीक्षांपासून करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

विधी शाखेच्या उत्तीर्णासाठी यापूर्वी सरासरी किमान 50 टक्‍के गुण मिळवणे ही अट होती. मात्र पुणे विद्यापीठाने विद्या परिषदेच्या बैठकीत पदवी स्तरावरील विधी (लॉ) विषयाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि सर्व विषयांमध्ये (अॅग्रीगेट) मिळून किमान 40 टक्के गुण मिळवण्याची अट असणार आहे, असा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले होते. मात्र या निर्णयाची कोणत्या वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे, त्याचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. त्याविषयाची परिपत्रक विद्यापीठाने दि. 2 नोव्हेंबर 2018 रोजी अधिकृतरीत्या जाहीर केले. त्यामुळे नव्या निर्णयावरील सर्व संभ्रम दूर झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना पूर्वीचेच नियम लागू होणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-19 मधल व त्यानंतर होणाऱ्या परीक्षा द्याव्या लागतील. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी 2017-18 मधील परीक्षेत जुन्या नियमाप्रमाणे अनुत्तीर्ण झाला असेल, तर त्याला 2018-19 मधील परीक्षा द्यावी लागेल. 2018-19 मध्ये व त्यापुढील होणाऱ्या परीक्षांमध्ये जर त्याने 40 गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले तर त्याला उत्तीर्ण म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)