विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवा ! 

विरोधी पक्षांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरवताना सरकारने केवळ अवघ्या 9 दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे. हा कालावधी विरोधी पक्षांना मान्य नाही. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर तसेच इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा, अशी मागणी केलेली होती. मात्र सरकारने अवघ्या नऊ दिवसांचे कामकाज निश्‍चित करुन अधिवेशन संपवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी घेऊन दोन्ही विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांशी सविस्तर चर्चा केली.

राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणाऱ्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, नसीम खान, सुनिल केदार, डी.पी. सावंत, यशोमती ठाकूर, जयकुमार गोरे, डी. एस. अहिरे, राजेश टोपे, विद्याताई चव्हाण, पंकज भुजबळ, संग्राम थोपटे, भाऊसाहेब कांबळे, ख्वाजा बेग मिर्झा, रामराव वडकुते, राणा जगजितसिंह, प्रकाश गजभिये, संग्राम जगताप, वैभव पिचड, दीपिका चव्हाण, सुमनताई पाटील, बबनदादा शिंदे, दत्तात्रय भरणे, सतीश चव्हाण, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, जगन्नाथ शिंदे, जीवा गावीत, नरहरी झिरवाळ, बाबा जानी दुर्रानी, त्रिंबक भिसे आदींचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)