मुंबई – शेतात विजेसाठी अर्ज करूनही कृषिपंपाला आवश्यक वीज मिळत नाही म्हणून पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने आज विधिमंडळाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सावधगिरी दाखत तो अंगावर रॉकेल ओतण्याआधीच त्याला ताब्यात घेतले. यामुळे पुढील अनर्थ टळला.
दत्तू माळी (55) असे या शेतकऱ्याचे नाव असून तो पंढरपूरच्या बाभूळगावाचा राहणारा आहे. माळी यांनी 2009 पासून कृषिपंपाला वीज मिळावी म्हणून अर्ज केला आहे. मात्र योग्य दाबाने वीज मिळत नसल्याने शेताला पाणी देण्यात वारंवार अडचणी येत आहेत. यासंदर्भात योग्य क्षमतेचे वीज कनेक्शन मिळावे म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यानंतरही त्याला हे कनेक्शन मिळाले नाही. ऊर्जामंत्र्यांपासून सर्व विभागांत पाठपुरावा करूनही त्याचे मागणे पूर्ण झाले नाही. अखेर आज सकाळी विधिमंडळाच्या आयनॉक्स सिनेमासमोरील गेट जवळ येऊन त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा