विधायक उपक्रमामुळे शिक्षक समितीचे अस्तित्व अबाधित : कांतआण्णा फडतरे

वडूज : चोराडे शाळेचे आदर्श शिक्षक व तडवळेचे सुपुत्र नवनाथ साबळे यांचा सत्कार करताना धनंजय क्षीरसागर, कांतआण्णा फडतरे, समीर तांबोळी व इतर.

वडूज, दि. 30 (प्रतिनिधी) – खटाव तालुका शिक्षक समिती सातत्याने विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. या उपक्रमामुळे संघटनेचे अस्तित्व अबाधित आहे, असे मत सेवानिवृत्त संघाचे तालुकाध्यक्ष व शिक्षक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे यांनी व्यक्त केले.
वडूज येथे संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या केंद्रप्रमुख व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. यावेळी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, संचालक चंद्रकांत मोरे, विठ्ठलराव फडतरे, संजय दिडके, समीर तांबोळी, श्री. महामुनी, केंद्रप्रमुख अनिल कदम, मोहनराव साळुंखे, तुकाराम यादव, रामचंद्र जाधव, प्रमोद जगदाळे, कांचन गरवारे, सुरेखा पवार, जयश्री चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडतरे म्हणाले, शिक्षक बॅंकेची सत्ता असो अथवा नसो समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रश्नासाठी कायम लढत असतात. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर समितीचे लोक नेहमीच दैनंदिन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. खटाव तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांनी चांगली एकोप्याची भावना ठेवली आहे. या बळावर भविष्यकाळात संघटनेला चांगले दिवस येतील. क्षीरसागर यांनी भाषणात संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सर्वारोग निदान शिबीर, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंत शिक्षकांचा गौरव या उपक्रमांचे कौतुक केले. तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दत्तात्रय पानस्कर, चंद्रकांत निकम, संजय खरात, सुनिल खाडे, वैभव जगताप, महेश मोरे, संग्राम जाधव, नवनाथ साबळे, जावेद इनामदार, रणधीर बारशिंग, मैथिली देशपांडे, रोशियाना डांगे, सविता जाधव, रेखा जाधव, अनुराधा केंद्रे या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)