विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय औटी यांची निवड

मुंबई: राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय भास्करराव औटी यांची अविरोध  निवड झाल्याचे आज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले.

उपाध्यक्षपदासाठी विजय औटी यांची दोन नामनिर्देशनपत्रे, बच्चू कडू आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र अशी तीन उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. त्यापैकी आज बच्चू कडू आणिहर्षवर्धन सपकाळ यांनी आपले नामनिर्देशनपत्र विहित वेळेत मागे घेतले. त्यामुळे विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केले.

निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी औटी यांचे अभिनंदन करुन त्यांना उपाध्यक्षांच्या आसनापर्यंत घेऊन गेले.

देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, अजित पवार, गणपतराव देशमुख विजय औटी यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)