विधानसभेची इमारत “स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच उभारु – चंद्राबाबू नायडू

अमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपावर कमालीचे नाराज असून भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही. आता नायडू यांनी विधानसभेची नवीन इमारत ही “स्टॅच्यू ऑफ युनिटी’पेक्षाही उंच बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात उंच बांधकाम ठरणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सीबीआयला राज्याचे दरवाजे बंद करुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता चंद्राबाबू नायडू यांनी गुजरातमधील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पेक्षा उंच इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथे विधानसभेची नवीन इमारत बांधली जाणार असून याची उंची 250 मीटर इतकी असणार आहे. “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची उंची 182 मीटर असून जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून याची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नायडू यांनी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

यासंदर्भातील निविदा नोव्हेंबरच्या अखेरीस काढण्यात येतील आणि यानंतर दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अपेक्षित असेल. या इमारतीत दोन गॅलरी असतील. यातील पहिली गॅलरी ही 80 मीटरवर असेल. तिथे 300 लोकांना उभे राहता येईल. तर दुसरी गॅलरी ही 250 मीटर उंचीवर असेल. तिथे 20 लोकांना थांबता येईल. या दोन्ही गॅलरीमधून अमरावतीचे विहंगमय दृष्य दिसेल, अशी माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)