विधानसभा उपाध्यक्षपदासाठी औटी, सकपाळ व बच्चू कडू यांचे अर्ज

आज होणार निवडणूक

मुंबई  – गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी उद्या, शुक्रवारी निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी शिवसेनेचे विजय औटी, कॉंग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू हे रिंगणात उतरले आहेत. या तिघांनी आज आपले अर्ज विधीमंडळाच्या प्रधान सचिवांकडे सादर केले आहेत. परंतु, शिवसेना-भाजपाच्या आमदारांचे संख्याबळ पाहता शिवसेनेचे विजय औटी यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

-Ads-

भाजप-शिवसेना सरकारचा जेमतेम एक वर्षाचा कार्यकाळ उरला असताना बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. उपाध्यक्षपदासाठी 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. आज, दुपारी 11.45 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती. या निवडणूकीसाठी शिवसेनेचे विजय औटी, कॉंग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्ज भरले आहेत. या तिघांचेही अर्ज वैध ठरले आहेत. एका जागेसाठी तिघांचे अर्ज आल्याने ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

उद्या, शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या तिघांपैकी दोघांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर निवडणूक अटळ आहे. सकाळी 11.30 ते 1 वाजेदरम्यान मतदान घेतले जाणार आहे. परंतु, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. विधानसभेत विरोधकांच्या तुलनेत भाजपाचे 123 आणि शिवसेनेचे 63 आमदारांचे संख्याबळ आहे. विरोधकापेक्षा तगडे संख्याबळ असल्याने विजय औटी यांचा विजय निश्‍चितच आहे. या निवडणूकीसाठी शिवसेना आणि भाजपाच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हिप बजावण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
10 :heart: Love
28 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
44 :cry: Sad
46 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)