विधानपरिषदेत राष्ट्रवादीचा स्थगन प्रस्ताव फेटाळला

नागपूर – नाणारप्रकरणी विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाणारसंदर्भात चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, नाणार प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नोटिफिकेशन रद्द करण्याची घोषणा कोकणवासीयांसमोर केली. मुख्यमंत्र्यांनी ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती असे म्हटले.

कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका वैयक्तिक कशी असू शकते. राज्य सरकार “रुल ऑफ डुईंग बिझनेस’नुसार चालणार आहे की नाही ? असा सवाल करत तटकरे यांनी सरकारला धारेवर धरले. कोकणवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे त्यामुळेच हे घडत आहे. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे काही मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.

मात्र त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही नाणार प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस व इतर पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

नाणार व अणुउर्जा प्रकल्प धोकादायक : जाधव
नाणार प्रकल्प झाल्यास रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सांगली, कोल्हापूर या चार जिल्हयांना धोकादायक ठरणारा आहे. जैतापूर अणूभटटी प्रकल्प या भागातच आहे. प्रस्ताविक नाणार प्रकल्प येथे होणार आहे. त्यामुळे हे दोन प्रकल्प वरील चार जिल्हयांना धोकादायक आहे. अवघ्या एक किलो मिटर अंतरावर हे दोन प्रकल्प आहे. त्यामुळे चारही जिल्हे उद्‌वस्त होण्याची भीती आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

विधानभवन परिसरात ते गुरूवारी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, विनाशकारी नाणार प्रकल्प 3 लाख कोटी रूपये खर्चून जनतेच्या बोकांडी मारला जाणार आहे. 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. परंतु या प्रकल्पाच्या अट्टाहासापायी जनतेचा विचार करण्यात आला नाही. एखादा अपघात झाल्यास जनतेचे किती मोठे नुकसान होईल, याचाही कोणता विचार करण्यात आला नाही. जैतापूर प्रकल्प आमच्या काळात मंजूर झाला पण दोन्ही प्रकल्प एकत्र करू नये, अशी मागणी त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)