विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी मतमोजणी 

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली ,अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ही निवडणूक होत असून रिक्त होणा-या या सहा जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार असून, 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेच्या सहा आमदारांची मुदत मे व जून 2018 मध्ये संपत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुदत संपणा-या आमदारांना निरोप देण्यात आला होता. मुदत संपलेल्या आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) जयंत जाधव ( नाशिक ), बाबा जानी दुर्राणी ( परभणी-हिंगोली), कॉग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड), भाजपाचे प्रवीण पोटे ( अमरावती ) आणि मितेश भांगडिया ( भाजप ) यांचा समावेश आहे. येत्या 26 एप्रिल रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारिख आहे. 21 मे रोजी मतदान होईल तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)