विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातील मतमोजणी पुढे ढकलली
मुंबई – उस्मानाबाद-लातूर-बीड वगळता स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवून देण्यासाठी झालेल्या पाच मतदारसंघातील निवडणूकीची उद्या, गुरूवारी मतमोजणी होऊन निकाल जाहिर केला जाणार आहे. उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्रधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत न्यायालयात खटला दाखल असल्याने भारत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील मतमोजणी पुढे ढकलली आहे.

या मतमोजणीला उद्या सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे. विधानपरिषदेसाठी पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने निकालासाठी काही काळ वाट पहावी लागेल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची मतमोजणी रत्नागिरीतील बचत भवनाच्या सभागृहात होईल. नाशिकची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या बचत भवनात घेतली जाईल. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीची मतमोजणी चंद्रपूर येथील तहसीलदार कार्यालयाच्या बैठक सभागृहात होईल. परभणी-हिंगोलीची मतमोजणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात तर अमरावतीची मतमोजणी नियोजन भवनात घेतली जाणार आहे.

विधानपरिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था प्रधिकारी मतदारसंघासाठी 21 मे रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची अघोषित युती होती तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीची समीकरणे बदलली. अनेक ठिकाणी क्रॉंस वोटींग झाल्याचे बोलले जाते. जेथे शिवसेनेचा उमेदवार आहे तेथे भाजपच्या मतदारांनी विरोधी पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा आहे. भाजपचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या मतदारांनी विरोधी पक्षाला मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

अशी झाली लढत…

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरूध्द राजीव साबळे (शिवसेना)

नाशिक…

नरेंद्र दराडे (शिवसेना) विरूध्द शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली…

इंद्रकुमार सराफ (कॉंग्रेस) विरूध्द रामदास आंबटकर ( भाजप)

परभणी-हिंगोली…

सुरेश देशमुख (कॉंग्रेस) विरूध्द विप्लव बाजोरिया (शिवसेना)

अमरावती….

प्रवीण पोटे (भाजप) विरूध्द अनिल मधोगरिहा (कॉंग्रेस)

उस्मानाबाद-लातूर-बीड…

सुरेश धस (भाजप) विरूध्द अशोक जगदाळे (अपक्ष)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)