विधवा, घटस्फोटित महिलांच्या अर्थसहाय्यात वाढ

स्थायीचा निर्णय ः नागरवस्तीच्या प्रस्तावाला मान्यता

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विधवा व घटस्फोटित महिलांच्या अर्थसहाय्यात चार हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील विधवा व घटस्फोटित महिलांना यापुढे पालिकेतर्फे दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. अर्थसहाय्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (दि. 21) स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग आणि महिला व बालकल्याण समिती अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याअंतर्गत विधवा व घटस्फोटित महिलांचे स्वावलंबन करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. त्यासाठी मनपाकडून अर्ज मागविले जातात. प्रत्येक लाभार्थी महिलेला पूर्वी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. मात्र, ही रक्कम तुटपुंजी असल्याने यात वाढ करण्याचा प्रस्ताव नागरवस्ती विकास योजना विभागाकडून स्थायी समिती सभेपुढे सादर करण्यात आला. स्थायी समितीच्या बैठकीत सभापती ममता गायकवाड यांनी अर्थसहाय्य वाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

नवीन प्रस्तावानुसार विधवा व घटस्फोटित महिलांच्या अर्थसहाय्यात चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापुढे लाभार्थी महिलेस 10 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. या योजनेच्या लाभासाठी 1 सप्टेंबर 2017 पासून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी प्रस्तावासोबतच्या 815 पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)