विद्रोही कवितेत समाज बदलाची ताकद!

भोसरी – कविता हे एक प्रभावी हत्यार असून, विद्रोही कवितेत समाज बदलण्याची ताकद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रह्म विविधांगी संस्थेच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कविसंमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मंजुषा दिलपाक होत्या. नगरसेवक दत्ता साने, विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यंकटेश वाघमोडे, पोलीस नागरिक मित्र प्रमुख राहुल श्रीवास्तव, संस्थेचे प्रभाकर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब मोरे, धिवराबाई भगत, इंदू कांबळे, सौरभ दिलपाक आदी उपस्थित होते.

-Ads-

मानव कांबळे म्हणाले, व्यक्त होणारी प्रत्येक भावना ही कविता असते. जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे व वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य विद्रोही कवितेत असते. त्यामुळे विद्रोही कविता मला अधिक जवळची वाटते.

डॉ. मंजुषा दिलपाक म्हणाल्या, निसर्ग हा देण्याचे काम करतो. निसर्गाचा हा नियम माणसानेही पाळायला हवा. समाजाचे आपण देणे लागतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. कोणतीही जात-पात न मानता भारतीय म्हणून सर्वांनी एकवटले पाहिजे. तर दत्ता साने म्हणाले, जातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.

वसंत घाग यांनी बाबासाहेबांवरील पोवाडा सादर केला. सुयोग भगत याने “जेव्हा अंधार भयाण दाटला, ग्रहण लागले माणुसकीला, होऊन दीप क्रांतीचा, तेव्हा भीमा माझा आला’ ही कविता सादर केली. गोविंद गोरडे, गायत्री कुंजीर, मंथन मनोज कदम, अथर्व अर्जुन बांद्रे, यश पवार, स्वयंम पुरी, श्रावणी बोरकर, अनिष्का घाटे, तनुजा बोरकर, कुमारी चौघुले यांनीही कविता सादर केल्या. योग प्राध्यापक राजाराम लोंढे यांनी योग गीत सादर केले. तर मेघना आंब्रे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)