विद्युत दाहिनी अभावी गैरसोय

पिंपरी – निगडीतील अमरधाम स्मशानभुमीतील विद्युत दाहिनी 20 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी विद्युतदाहिनी तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. विद्युत दाहिनीस 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्युत दाहिनीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत आहे. नादुरुस्त झाल्यावर महिना-महिना भर दाहिनी बंद ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मृतदेह दहन करण्यासाठी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यासाठी पैसे पण अधिक लागतात. तसेच लाकडांसाठी झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी महापालिकेने तातडीने अमरधाम स्मशानभूमीत विद्युत दाहिनी सुरु करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना फ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोडे म्हणाले, स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी सात जानेवारीपासून बंद आहे. दाहिन्याच्या दुरुस्तीचे काम काम हाती घेण्यात आले आहे. कॉईल आणि ब्रिंग्स बदलल्या जाणार असून त्या ऑर्डर देऊन तयार करुन घ्यावा लागतात. त्यामुळे दुरुस्तीला विलंब लागत आहे. येत्या सात ते आठ दिवसात विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे आयुष्य 10 वर्षाचेच होते. विद्युत दाहिनीला 14 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यामुळे ही विद्युत दाहिनी कधीही बंद होऊ शकते. त्यासाठी नवीन दाहिनी बसविण्यात येणार आहे. स्थायी समितीने विद्युतदाहिनी बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता घेतली आहे. स्मशानभूमीत लवकरच नवीन विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे.
– प्रा. उत्तम केंदळे, स्थानिक नगरसेवक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)