विद्युत तारेच्या धक्‍क्‍याने कामगाराचा मृत्यू

महाळुंगे इंगळे – कंपनीत पेंटशॉपमध्ये लाईनवर पंखा दुरुस्तीचे काम करीत असताना चाकण उद्योग पंढरीतील आंबेठाण (ता. खेड) येथील मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्‍निकल इंजिनिअरिंग या कंपनीत विद्युत तारेचा जबरदस्त धक्का लागून कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
संतोषकुमार साहू (वय 34, रा. व्यंकटेश्वर पार्क, शंकर काळजे नगर, वाकड, पुणे) असे या कामगाराचे नाव आहे. मदरसन कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी कपिल धनिलाल यादव (वय 29, रा. कॉलनी नं. 2, जी. पी. नगर, पीसीएमटी बस थांब्याजवळ, भोसरी, पुणे) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण – आंबेठाण रस्त्यावर आंबेठाण ( ता. खेड ) गावच्या हद्दीत मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्‍निकल या नावाची कंपनी आहे. या कंपनीत बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान साहू हा कामगार कंपनीतील पेंटशॉपमध्ये लाईनवर पंखा दुरुस्तीचे काम करीत होता. त्यावेळी अचानक तेथील विद्युत तारेचा त्याला धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी साहू याच्या आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती सूळ व त्यांचे सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)