विद्युत खांबांवरील फलक काढण्यासाठी 95 लाख

पिंपरी – महापालिकेच्या विद्युत खांबांवर लावलेले दोन बाय तीन फूट या आकाराचे अवैध जाहिरात फलक काढण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना एक फलक काढण्यासाठी 24 रुपये मिळणार आहेत. या कामासाठी एकूण खर्च 95 लाख रुपये होणार आहे.

महापालिका हद्दीत खासगी आणि महापालिकेच्या जागेवर पक्‍क्‍या लोखंडी स्ट्रक्‍चरवर जाहिरात फलक उभा करण्यास आणि विद्युत खांबांवर दोन बाय तीन फूट या आकाराचे जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्याचे काम महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून केले जाते. परवानगी न घेता असे फलक लावल्यास ते आकाशचिन्ह परवाना विभागाकडून काढले जातात. पक्‍क्‍या लोखंडी स्ट्रक्‍चरवर अवैध लावलेले जाहिरात फलक काढण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत एजन्सी नेमण्यात आली आहे; परंतु विद्युत खांबांवर लावलेले दोन बाय तीन फूट या आकाराचे अवैध जाहिरात फलक काढण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज महापालिकेला भासली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या विद्युत खांबांवर बहुतांशी ठिकाणी परवानगी न घेताच फलक लावले जातात. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. यासाठी एजन्सी नेमल्यास जाहिरातदार मंजुरी घेऊनच अशा प्रकारचे फलक लावतील आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच शहराचे विद्रुपीकरणही होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने असे अवैध फलक काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. दोन बाय तीन फूट या आकाराप्रमाणे एक फलक काढण्यास 330 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, फलक काढण्यास अंदाजे 95 लाख 4 हजार रुपये वार्षिक खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

नऊ एजन्सीकडून निविदा
विद्युत खांबांवरील दोन बाय तीन फूट आकाराचे जाहिरात फलक काढून नेहरूनगर येथील गोदामात जमा करण्याबाबत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, नऊ जणांनी निविदा दर सादर केले. त्यामध्ये दत्तकृपा सेवा सहकारी संस्थेने दोन बाय तीन फूट आकाराचा जाहिरात फलक काढण्यासाठी 24 रुपये इतका सर्वात कमी दर दिला आहे. या प्राप्त दराबाबत अंतर्गत लेखा परिक्षण विभागाने दर स्विकारण्यास हरकत नसल्याबाबत अभिप्राय दिला आहे. त्यानुसार, श्री दत्तकृपा सेवा सहकारी संस्थेचा 24 रुपये दर स्वीकृत करण्यास तसेच नियमानुसार येणाऱ्या 95 लाख रूपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिल्यानंतर त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)