विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे मंगळवारपासून उपोषण

अकलूज- ग्राहकांना वेळेत सुविधा पुरविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीबरोबरच कामगारांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मागणीसाठी विद्युतक्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने मंगळवार (दि. 29) पासून येथील महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. त्यामध्ये प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा देणाऱ्या कामगारांना हातमोजेसारख्या सुविधा नसल्याचे सांगताना अकलूज विभागातील बहुतेक उपकेंद्रात साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, डी. पी. अर्थिंगसाठी पाणी नाही, रात्री उजेडाची सोय नाही, कार्यालयात खुर्च्या, पंखे नाहीत… अशा गैरसोयी सांगून कामगारांना कामावर असताना गैरहजर दाखवणे, काम करीत असताना मशिनरीचा घोटाळा झाल्यास त्यास संबंधित कामगारास दोषी धरणे, ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी लागणारे साहित्य न देणे अशा तक्रारी करण्यात आल्या. याशिवाय कामगारांनी केलेल्या अतिरिक्त कामाच्या बिलाच्या फाईल्स गायब होण्याचे प्रकारही सांगण्यात आले. याबाबत संबंधित वरिष्ठांकडे केलेल्या निवेदनाच्या प्रतीही यावेळी देणौयात आल्या. या निवेदनात नमूद केलेल्या सर्व बाबींची पूर्तता न झाल्यास मंगळवार (दि. 29) पासून अकलूज कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हा सहसचिव बशीर नूरमहंमद, विभागीय अध्यक्ष सुनील लोंढे, विभागीय सचिव अंकुश खरात, संघटक प्रमोद धांडोरे, जिल्हा पतसंस्थेचे संचालक मंजूर शेख, प्रमोद सराटे, मुस्तफा शेख, शंकर आगम आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)