“विद्या विकास’च्या 22 विद्यार्थ्यांचे यश

अवसरी – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर येथे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती विद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर येथे वेदांत वाळूंज, आर्यन चव्हाण, ओमकार भाईक, प्रीती शिंदे, साहिल गायकवाड, ओम पाचारणे, विशाल भांगे, अथर्व थोरात, वेदांत अरगडे, अनुष्का चव्हाण, ओमकार कोरडे, यश भालेराव, ओमकार शिंदे, समीक्षा ढोबळे, अस्मिता बानखेले, यश दैने, पार्थ थोरात, समीक्षा थोरात, पल्लवी वळसे, सोहम भोर आणि सुयश शिंदे यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक सी. पी. शेवाळे, डी. बीण डुंबरे, एम. एच. कुंभार, एन. आर. टाव्हरे, एस. एच. शेवाळे (विभाग प्रमुख), एस. के. जारकड यांनीमार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)