विद्यार्थ्यास जखमी करणाऱ्या शिक्षकावर कारवाई करा

मानवाधिकार संघटनेची मागणी ः शाळेसमोर आंदोलनाचा इशारा
राहुरी, दि. 20 (शहर प्रतिनिधी) – श्रीरामपूर येथील एका शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यास शिक्षकाने जखमी केले. या शिक्षकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे.
श्रीरामपूर येथील राजूसागर भागवत हा शहरातील एका इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीत शिकतो. 8 मार्चला एका शिक्षकाने त्यास जोराचा गुद्दा मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अन्यथा शाळेसमोर आंदोलन छेडू, असा इशारा मानवाधिकार संघटनेने दिला आहे.
मानवाधिकार टीमने पुण्यातील संचेती हॉस्पिटल येथे जाऊन राज भागवत याची भेट घेतली. शिक्षकावर कारवाईची मागणी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास निर्मळ, संपर्कप्रमुख गणेश भांड, प्रवीण फरगडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)