विद्यार्थ्याने प्राध्यापिका वर्गात ओरडते म्हणून त्यांचा फोन नंबर टाकला पॉर्नसाईटवर

अहमदाबाद: प्राध्यापिका वर्गात ओरडते म्हणून त्या विद्यार्थ्याने त्यांचा फोन नंबर पॉर्नसाईटवर टाकला आहे. ही घटना अहमदाबाद येथे घडली असून, त्यानंतर अश्लील मेसेज आणि फोन सुरु झाले. ह्या सगळ्याला वैतागलेल्या प्राध्यापिकेने पोलिसात तक्रार केल्यानंतर हे सत्य उघडकीला आलं. हा विद्यार्थी २४ वर्षांचा आहे.

प्राध्यपिका त्या मुलाला, त्याच्या त्याच्या शैक्षणिक प्रगतीवरून त्याला ती ओरडत होती. तिच्या ओरडण्याचा सूड म्हणून त्याने तिचं नाव, नंबर, ईमेल आयडी आणि फोटो पॉर्न साईटवर पोस्ट केला. त्यानंतर प्राध्यापिकेला अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. तिच्या फोन आणि ईमेलवर अश्लील मेसेज येऊ लागले. या सगळ्यामुळे त्रासलेल्या प्राध्यापिकेने पोलिसात तक्रार केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतल्या नंतर तपास सुरु केला. या पॉर्नसाईट विदेशातून चालवल्या जात होत्या. त्यांच्याशी संपर्क करून या वेबसाईटवर संबंधित माहिती अपलोड करणाऱ्या व्यक्तिचे तपशील पोलिसांनी मागितले. त्यांनी या विद्यार्थ्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)