विद्यार्थ्याच्या कारने धडक दिलेल्या वॉचमनचा मृत्यू

वाघोली-कॉलेज कॅम्पस परिसरात विद्यार्थ्याने भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून कॉलेजच्या वॉचमनला धडक देऊन गंभीर जखमी केल्याने वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सौरभ वारघडे या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्यास अद्यापही अटक केली नाही.
उत्तम कैलास खंडागळे असे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या वॉचमनचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ वारघडे हा विद्यार्थी गुरुवारी जेएसपीएम कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालवत होता. यामध्ये त्याने कॅम्पसच्या मागील बाजूस एमबीए गेटजवळ ऑनड्युटी असणाऱ्या वॉचमन उत्तम खंडागळे याला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. अपघातानंतर खंडागळे यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर कारचालक विद्यार्थी सौरभ वारघडे या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर जखमी झाल्याने वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघात केलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

  • अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वॉचमनचा मृत्यू झाल्याने 304 वाढीव कलम लावून वारघडे याला अटक करण्यात येईल. त्याचे लायसन्स व इतर कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कॉलेज कॅम्पस परिसरात विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीबाबत बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील.
    -सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)