विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करा!

तंत्रशिक्षण विभागाचे संस्थांना तंबी : मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्याची चिन्हे

पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक युगामुळे नैराश्‍याची भावना निर्माण होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या ताण-तणावांचे संस्थास्तरावर वेळीच निवारण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्याची चिन्हे आहेत.

इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, आर्किटेक्‍चर, पॉलिटेक्‍निकसह आदी अभ्यासक्रमे व्यावसायिक आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक व प्रशासकीय कामे होत असतात. शाळांतील अंतर्गत मूल्यमापन व फेस्ट ऑफ फाईव्हच्या सवलतीमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात होत आहे. त्यामुळे मुलांकडून पालकांची अपेक्षा वाढत आहेत. हे अपेक्षांचे ओझे घेऊन विद्यार्थी शैक्षणिक वाटचाल करीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्‍याला सामोरे जावे लागत आहे. यातूनच विद्यार्थी टोकाचा निर्णय घेत असतात. या नैराश्‍यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र अथवा सेल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे अनिवार्य आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही तंत्रशिक्षणने सर्व संस्थांना कळविले आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी आपआपल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असेही तंत्रशिक्षणने सूचविले आहे.

संस्थास्तरावर विविध उपाययोजना आवश्‍यक
विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन सुखकर होण्यासाठी सांघिक चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व स्फूर्तीदायक व्याख्याने, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लागणारे शिबिराचे आयोजन करण्याचे तंत्रशिक्षणने सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी संस्थांनी आपल्या स्तरावर विविध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. याबाबत संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवालही दर सहा महिन्यांनी तंत्रशिक्षण कार्यालयालास सादर करण्याचे आदेशही पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी. आर. नंदनवार यांनी दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)