विद्यार्थ्यांसाठी भरीव निधी देण्याची शिवाजी विद्यापीठ अधिसभेत सुचना

कोल्हापूर  – शिवाजी विद्यापीठाच्या २०१८-१९ आर्थिक वर्षाच्या २ कोटी ६५ लाख १३ हजाराच्या तुटीच्या अंदाजपत्रकास अधिसभा सदस्यांनी मान्यता देत, अपेक्षित जमा होणाऱ्या ३६१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात सदस्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून निधीच्या तरतुदीला मंजुरी दिली. संशोधन, क्रीडा, प्रशिक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. या सूचनांचा विचार प्रस्तावित सुधारित अंदाजपत्रकात केला जाईल, असे सभा अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आश्‍वासन दिले.

विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आज झालेल्या अधिसभेत अंदाजपत्रक सादर केले. अधिसभेत विषय क्रमांक चारनुसार २०१७-१८ चे सुधारित अंदाजपत्रक व २०१८-१९ चे वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार अधिसभेत मान्यतेसाठी ठेवले. प्राचार्य डॉ. सी. टी. कारंडे यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी विशद केल्या. प्रथमच हे अंदाजपत्रक संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर केले. सदस्यांनीही लॅपटॉपवर सभेचे पेपरलेस कामकाज झाले. उपस्थित झालेल्या प्रश्‍नास प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले व डॉ. कारंडे यांनी उत्तरे दिली.

अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, संशोधक विद्यार्थ्यांना सुविधा, शिष्यवृत्ती, खेळाडू, विद्यार्थी कलाकारांना तरतूद वाढवावी. खेळाडूंना दिले जाणारे भत्ते, प्रशिक्षणासाठी भरीव तरतूद करावी असा सदस्यांनी आग्रह धरला. कुलगुरूंसह पदाधिकाऱ्यांच्या संगणक, आधुनिकीकरणासाठी केलेल्या खर्चावर अनेकांनी आक्षेप घेतला. विद्यापीठात १२० सुरक्षा रक्षक आहेत. त्यातील फक्त १७ कर्मचारी कायम असून इतर कर्मचारी हे कंत्राटी आहेत. त्यांच्या वेतनासाठी तब्बल ३ कोटीहून अधिक रकमेची तरतुदीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्या तरतुदीतील एक कोटीची रक्कम कपात करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित तरतूद करून त्यांना तशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)