विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज

वडूज : फित कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना सौ. रजनी भोसले शेजारी अनिल जगताप, विक्रांत डोंगरे, कमलाकांत म्हेत्रे, सौ. रंजना डगळे, मधुकर भोसले व इतर.

सभापती सौ. रजनीताई भोसले यांचे प्रतिपादन
वाई, दि. 24 (प्रतिनिधी) – पर्यावरणाच्या रक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे काळाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला तरच आपण दुष्ट चालीरितींच्या विळख्यातून बाहेर पडून देशाला महासत्ता बनवू शकू, असे प्रतिपादन वाई पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनी भोसले यांनी केले.
आसरे (ता. वाई) कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात आयोजित वाई तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती अनिल जगताप, जिल्हा परिषद सदस्या सौ. शारदा ननावरे, सौ. रंजना डगळे, माजी उपसभापती सौ. शोभा सणस, पंचायत समिती सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, सौ. सुनिता कांबळे, सौ. संगीता चव्हाण, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, सरपंच बबनराव सणस, उद्योजक संतोषशेठ आंबवले आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. रजनी भोसले म्हणाल्या, विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व विज्ञानाविषयी जागृती निर्माण होईल. समाजातील अंधश्रध्दा निर्मुलनासाठी हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. वाई तालुका गुणवत्ता विकासामध्ये अग्रेसर असून विविध उपक्रमांव्दारे वाई तालुक्‍याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावेळी अनिल जगताप, कमलाकांत म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. दिलीप मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. संतोष शिंदे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक मारूती ससाणे यांनी आभार मानले.
या प्रदर्शनात वाई तालुक्‍यातील प्राथमिक विभागातून 90 तर माध्यमिक विभागातून 34 शाळांनी आपली उपस्थिती नोंदविली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)