विद्यार्थ्यांमधील उद्योजक विकासाला ‘ब्रेक’

विद्यापीठातील उद्योजकता केंद्रात तोकडे मनुष्यबळ 


53 लाखांच्या निधीमधून 1 लाखच खर्च

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संशोधनातून उद्योजकतेचा विकास होण्यासाठी “इनोव्हेशन, इनक्‍युबेशन आणि उद्योजकता केंद्र’ सुरू केले. मात्र, या केंद्रासाठी तरतूद करण्यात आलेल्या 53 लाखांपैकी केवळ 1 लाखाचा निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले हे केंद्र केवळ नावापुरती कार्यरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या कार्यकाळात विद्यापीठातील संशोधन वाढावे आणि विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेचा विकास व्हावा, या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले. त्यासाठी अर्थसंकल्पात 53 लाखांची तरतूद करण्यात आली. विद्यार्थ्यांकडे अनेक नवीन कल्पना असतात. त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यातून पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना कंपनी स्थापन करून उद्योजक होण्याचे स्वप्न करण्याची संधी दिली. त्यातील तिघे जण सध्या उद्योजकतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.
दीड वर्षापूर्वी सुरू झालेल्या या उद्योजकता केंद्रात मनुष्यबळच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या या केंद्रात एकच क्‍लार्क असून, या कार्यालयात शिपाईही नाही. निधीची तरतूद असतानाही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधनात उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांना “स्टार्ट अप’ हे व्यासपीठ उपलब्ध आहे. मात्र, ज्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले केंद्र, त्याचे काम मात्र संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
एवढेच नव्हे, तर या केंद्रासाठी गेल्या आर्थिक वर्षात 53 लाखांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यातील आतापर्यंत केवळ 1 लाख रुपये एवढाच खर्च करण्यात आला आहे. विद्यापीठाकडे निधी असतानाही, संशोधक विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी य केंद्राकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

… तर केंद्राला गती मिळण्याची चिन्हे
विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळण्यासाठी नवीन विद्यापीठ कायद्यात नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या स्वतंत्र विभागांची निर्मिती करण्यात आली. इनोव्हेशन व उद्योजकता केंद्रही याच विभागाकडे कार्यरत आहे. या विभागाच्या संचालक पदासाठी विद्यापीठाने निवड प्रक्रिया राबविली. मात्र, अद्यापही नियुक्‍तीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या विभागाला संचालकपदाची नियुक्‍ती झाल्यास उद्योजक केंद्राला गती मिळण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)