विद्यार्थ्यांनो, सज्ज व्हा…, वन नेशन – वन बोर्डसाठी

– प्रा. सुनील भाकरे ः पुढील काळात देशात एकाच बोर्डाचा अभ्यासक्रम येणार

जुन्नर- सध्याचा काळ बदलता आहे, त्यामुळे शिक्षणातही क्रांती होत आहे. यापुढील काळात देशात एकाच बोर्डाचा अभ्यासक्रम राबवला जाईल. “वन बोर्ड; वन नेशन’ या क्रांतिकारी बदलाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी तत्पर झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रमातून अभ्यासवृती जोपासली पाहिजे असे आवाहन करिअर काउन्सेलर प्रा. सुनील भाकरे यांनी जुन्नर येथे केले. विद्यासंस्कार प्रतिष्ठान आयोजित “दहावीनंतर करिअरची दिशा’ या विषयावर ते बोलत होते. दहावीनंतर पदविका, बारावीनंतर पदवी याच संधी उपलब्ध आहेत. हा संकुचित दृष्टिकोन आता बदला, असे सांगतानाच बहुआयामी कौशल्ये विकसित करून चांगले करिअर होऊ शकते. यासाठी पालकांनी अभ्यासकमाच्या संधी शोधून मुलांसाठी त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

विद्यासंस्कार प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. विश्वास भालेकर, प्रा. धर्मेंद्र कोरे, प्रा. मोहन गाडेकर, प्रा. विलास कडलाक, प्रा. जयप्रकाश फल्ले यावेळी उपस्थित होते. यावेळी सेजल दुराफे – टॅब (अण्णासाहेब आवटे विद्यालय, जुन्नर), मृदुला काळे – स्मार्टफोन (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर),
अनस काझी – जिओ डोंगल (अंजुमन हायस्कूल, जुन्नर), वैष्णवी

  • स्मार्ट वॉच – (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, इंग्रजी माध्यम शाळा, जुन्नर), शाहुबाई देवकाते – ब्ल्यू टूथ हॅंड सेट -(शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर), साक्षी घोलप – ब्ल्यू टूथ स्पीकर (अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, संगमनेर) आदी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)