विद्यार्थ्यांनो, ऑनलाइन सीईटीसाठी सज्ज व्हा!

– व्यंकटेश भोळा

पुणे – इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी बारावी निकालापूर्वीच “एमएचटी-सीईटी’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. यंदापासून ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन परीक्षा देण्याची मानसिकता निर्माण होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे सोयीस्कर होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

“एमएचटी-सीईटी’चे अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरुप व गुणांकन पद्धत जाहीर करण्यात आले. त्यात गतवर्षीप्रमाणेच अकरावी अभ्यासक्रमांवर 20 टक्‍के आणि बारावीच्या 80 टक्‍के प्रश्‍न असतील. सर्वात महत्त्वाचे ही परीक्षा जेईई-मेन धर्तीवर होत असली, तरी प्रश्‍न मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित राहतील. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा फार अडचणीची ठरणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षा कशा पद्धतीने द्यायचे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केंद्रीय स्तरावर अभियांत्रिकी, आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी जेईई-मेनपरीक्षा घेतली जाते. जेईई-मेनची परीक्षा पहिल्यादांच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यावेळी त्या प्रश्‍नपत्रिका कशा पद्धतीने असतील, विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवावा, संगणक कशा पद्धतीने हाताळावे, याविषयीच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे सोयीचे झाले. त्या पद्धतीने उच्च तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाही केल्यास, ते निश्‍चित विद्यार्थ्यांना उपयुक्‍त ठरण्याची चिन्हे आहेत.

बारावी उत्तीर्ण तथा बारावी परीक्षेला बसणारे विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात. दरवर्षी सुमारे 4 लाखांहून अधिक विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी नावनोंदणी करतात. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असते. अशा परिस्थितीत सर्वच विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला सामोरे जातील, याविषयी सांशकता आहे. त्यातच ऑनलाईन परीक्षेसाठी अद्यापपर्यंत तंत्रशिक्षण विभागाने काहीच उपाययोजना केली नाहीत, असे कांगावा करीत शिक्षण घटकांतील काही जण यंदाच्या वर्षी ऑनलाईन परीक्षा शक्‍य नाहीच, अशा सूर आवळत आहेत. अशा परिस्थितीत तंत्र शिक्षण विभागाला वेळीच पाऊले उचलावे लागतील, हे मात्र वस्तुस्थिती आहे.

राज्य सीईटी कक्षामार्फत “एमएचटी-सीईटी’ घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना संगणकीकृत सीईटीसाठी कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रशिक्षण विभाग आणि राज्य सीईटी सेलतर्फे योग्य पद्धतीने तयारी करणे आवश्‍यक आहे. राज्यातील शिक्षणाचा विस्तार पाहता ऑनलाइन परीक्षा घेण्यास काहीच अडचण उद्‌भवणार नाही. मात्र, विद्यार्थी सक्षमपणे ऑनलाइन सीईटी देतील, त्याविषयी त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण विभागाला आतापासून सुरूवात करावी लागेल. एकूणच विद्यार्थ्यांना ऑनलाइन सीईटीसाठी आता सज्ज राहावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)