विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा – प्रा. दुर्गाडे

केडगाव- जगाच्या पाठीवर भारत आणि चीन सर्वात बुध्दिमान देश आहेत, असे अमेरिका देशाचे माजी अध्यक्ष ओबामा म्हणत. भारतीय विद्यार्थ्याकडे हुशारी आहे. फक्त त्याने सकारात्मक विचार करून जिद्द आणि कष्ट केल्यास यश निश्‍चित आहे पालक आणि शिक्षक यांनी मार्गदर्शक बनावे मुलांना त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे अभ्यास आणि करीअर करू द्यावे, अपयश आल्यास हरू नका तडजोड करायला शिका, असे मत जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले. दौंड तालुका शिक्षक सेलच्या वतीने देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “वेध भविष्याचा’ हा करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते केडगाव (ता. दौंड) येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्‍याचे माजी आमदार रमेश थोरात होते. यावेळी थोरात म्हणाले की, सध्या स्पर्धा वाढली आहे. अशावेळी शांत आणि संयम ठेवायला शिका, चांगली स्वप्न बाळगून कामाला लागा, यश निश्‍चित मिळेल. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, सभापती झुंबर गायकवाड, पंचायत समिती सदस्य नितीन दोरगे, सयाजी ताकवने, रामभाऊ टुले, माजी सभापती मीना धायगुडे, व्याख्याते हेमचंद्र शिंदे, लक्ष्मण दिवेकर, नाना फडके, अरुण थोरात, राजेंद्र जगताप, भानुदास नेवसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी आमदार कै. बाळासाहेब जगदाळे यांना श्रध्दांजली देण्यात आली, तसेच गुणवत्त शिक्षक आणि उपक्रमशील शाळांचा गौरव करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)