विद्यार्थ्यांनी संकलित केला “लाख’मोलाचा निधी

पुणे- केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी गेले तीन दिवस शहराच्या विविध सिग्नलवर नागरिकांना आवाहन करून तब्बल 1 लाख 1 हजार 800 रुपयांचा निधी गोळा केला. तो कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या इतिहास विभागातील 28 विद्यार्थी आणि 13 विद्यार्थिनिंनी मिळून ही रक्कम जमा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 18 ते 20 ऑगस्ट या काळात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सिग्नल तसेच, डेक्कन, दगडूशेठ गणपती, खडकी स्टेशन, शिवाजीनगर येथे नागरिकांना आवाहन करून निधीचे संकलन केले. प्राध्यापक डॉ. श्रद्धा कुंभोजकर, प्रा. बाबासाहेब दूधभाते व डॉ.करमळकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. हा निधी कुलगुरूंच्या विशेष निधीतून केरळी बांधवांसाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)