विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर केला हिरवागार

आळेफाटा- पाणी टंचाईवर मात करत वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडे जगविण्यासाठी एक अनोखा प्रयोग अमलात आणला आहे. बिसलरीच्या रिकाम्या फेकून दिलेल्या बाटलीमधे पाणी भरून बाटलीच्या बुचात दोरी ओवून ती दोरी निम्मी बाटलीच्या पाण्यात आणि निम्मी दोरी बाटलीच्या बाहेर ठेवून ही दोरी झाडाच्या बुंध्यात मातीत पुरून बाटली उलटी करून झाडाला बांधून ठेवल्यास सुमारे 21 दिवस झाडाला ओलावा टिकून राहतो. शाळा परिसरातील 200 झाडांना हा प्रयोग करण्यात आला असल्याने येथील परिसर हिरवागार दिसू लागला आहे. या प्रयोगाचा शुभारंभ आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आणि या प्रयोगाचे मुख्य मार्गदर्शक डी. बी. वाळूंज, आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर नरवडे, पोलिस नाईक जगताप, फलके, भोर, इचके, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, शिक्षका हिले, कालेकर व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सुधीर नरवडे, डी. बी.वाळूंज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील ठिकेकर यांनी मान्यवरांचा सन्मान केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)