विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण ही घ्यायला हवे

नीरा – विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवसाय शिक्षणही घ्यायला हवे. व्यावसायिक ज्ञान तुम्हाला खूप उपयोगाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला महात्मा गांधी विद्यालायाचे मुख्याध्यापक रघुनाथ वाव्हुळ यांनी नीरा येथे बोलताना दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. नीरा (ता. पुरंदर) येथे यश एज्युकेशन सोसायटीच्या 10 वी मध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे आणि एम एस्सी, आयटी अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक यकरण्यात आले, यावेळी वाव्हुळ बोलत होते. यावेळी संचालिका ऍड. हेमलता जगदाळे, महात्मा गांधी विद्यालय आणि सौ. लीलावती रिखवलाल शहा विद्यालयातील शिक्षक पालक उपस्थित होते. हेमलता जगदाळे यांनी प्रास्तविक केले. पालकांमधून सलीम शेख यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचाही मोठा वाट असतो.असे म्हणत पालकांचेही कौतुक केले व आपल्या पाल्यास योग्यते शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करण्याचे अवाहन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)