विद्यार्थ्यांनी भविष्याकडे लक्ष द्यावे – श्रुती पारकर

शिवनेरी- विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्यकाळात आपल्याला काय करायचे आहे ते लहान वयातच ठरवून वाटचाल केली तर जीवनात यश नक्की मिळेल,असे विचार नाट्य व सिनेअभिनेत्री श्रुती पारकर यांनी चाळकवाडी येथे व्यक्त केले.
येथील शिवांजली शैक्षणिक संकुलनाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, मुलांनी मोबाइलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. पालक आपल्याला आपल्या चांगल्या भवितव्यासाठी काही गोष्टी सांगत असतात त्या ऐकल्या पाहिजेत, पालकांनीही आपल्या मुलांना समजून घेतले पाहिजे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, “शिवांजली’चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चाळक, शशिकांत नवले, हभप सखाराम चाळक, उपसरपंच प्रदीप चाळक, अशोक सोनवणे, पोलीस पाटील संदीप कसबे, तुळशीराम नरवडे, कोंडीभाऊ वामन गजानन चाळक दत्ता टाकळकर विजय सोनवणे आरती वायकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी क्रिडास्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे सुरेश सोनवणे, प्रा. गणेश सोनवणे, दीपक सोनवणे, मिनानाथ सोनवणे यांचाही त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. आर. चासकर यांनी केले. सूत्रसंचालन बी. डी. जाधव आणि आदिती चाळक यांनी केले, तर आभार प्रदीप चाळक यांनी मानले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)