विद्यार्थ्यांनी भरवला आगळावेगळा आठवडी बाजार

निवृत्तीनगर- विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन व्यवहार ज्ञान, व्यवहार चातुर्य, विविध भाज्यांची माहिती, गणित विषयाचे सखोल आकलन, अशा अनेक कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथील स्व. प्रा. रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये “विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाकरीता विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात फळे, भाजीपाला, शालेयोपगी साहित्य, किराणामाल, खाद्यपदार्थ आदींचे विविध प्रकारचे स्टॉल्स थाटले होते. यावेळी ग्राहकांची गर्दी असतानाही विद्यार्थ्यांनी स्वतः मालाची विक्री करून कार्यानुभवाचा एक वेगळा अनुभव घेतला.
बाजारहाट प्रकल्पाची संकल्पना शाळेचे प्राचार्य सखाराम मातेले यांनी मांडली. त्यास सर्व शिक्षाकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाचे श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन आणि श्री विघ्नहर ट्रस्टचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर तसेच मातोश्री श्रीमती सुमित्राताई शेरकर व विघ्नहर ट्रस्टचे सदस्य, आदींनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना त्यांनी उपयुक्त असे मार्गदर्शनही केले. या उपक्रमाद्वारे विविध वस्तू खरेदीसाठी पालक आणि शिक्षकवर्गाचा तसेच कारखाना कामगार वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. प्राचार्य सखाराम मातेले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने याकरीता विशेष परीश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)