विद्यार्थ्यांनी बॅंकीग क्षेत्राकडे गांभीर्याने पहावे

शिक्रापूर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत प्रचंड क्षमता आणि हुशारी आहे. वर्तमान परिस्थितीत स्पर्धा परीक्षेनंतर बॅंकीग क्षेत्रास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात प्रतिवर्षी ऐंशी हजार ते एक लाख नोकरभरती होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बॅंकीग क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत माजी प्रशासक आणि बॅंक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक कुमार तांबे यांनी व्यक्त केले.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील संभाजीराजे विद्या संकुल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना कुमार तांबे हे बोलत होते. याप्रसंगी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश पवार, बॅंक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक अनिल महादाद, युनियन बॅंकेचे सहप्रबंधक हरिचंद्र झांजे, संस्थेचे संचालक साहेबराव उमाप, उपसरपंच साहेबराव खळदकर, प्राचार्य पांडुरंग कोरडे, रामदास थिटे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश पवार म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हिताकरीता संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी, वाणिज्य अधिकारी तसेच उद्योगक्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जातात. तसेच संस्थेमार्फत अधिकारी आणि उद्योजक घडावेत. यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील राहील. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरिफ सय्यद आणि अश्विनी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा खो-खो स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)