विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे

  • रविंद्र पाटील : पाबळ येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

शिक्रापूर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्यकर सहआयुक्त रविंद्र पाटील पुणे यांनी व्यक्त केले.
पाबळ (ता. शिरूर) येथील श्री पद्ममणी जैन महाविद्याल येथे शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष भगवान घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी रवींद्र पाटील बोलत होते.
यावेळी राज्यकर अधिकारी पुणे विभागाचे विनीत थिटे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, नियोजन, अभ्यासक्रम याबाबत माहिती दिली. तर राज्यकर आयुक्त पुणे विभागाचे ए. व्ही. शेवाळे यांनी सकारात्मक विचारांच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी सहाय्यक राज्यकर आयुक्त अविनाश चव्हाण, राज्यकर उपायुक्त हनुमंत शिंदे, नंदकुमार पलांडे, प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हनुमंत भवारी यांनी केले. तर प्रास्ताविक स्पर्धापरीक्षा प्रमुख बी. एन. शिंदे आणि गणेश सोनवणे यांनी केले तर डॉ. रेहणा बेग यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)