विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावेत

सातारा – सन 2018-2019 या वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शखेत शिकणाऱ्या व 2019-20 या शैक्षणिक वर्षात व्यावसायीक पाठक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटकया जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर मागासवर्गाती विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 डिसेंबर 2018 पर्यंत आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या व सन 2019-20 या वर्षात पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.31 जानेवारी 2019 पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा 415 सदर बझर सैनिक नगर (महादेव नगर )जरंडेश्‍वर नाक्‍याजवळ सातारा येथे सादर करावेत. येताना सर्व कागदपत्रे आणवीत मुळ कागदपत्रे तपासून लागचे अर्जदारास परत केली जातात.विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रु.100/- शुल्क आकारण्यात येते त्याची अर्जदारास रीतसर पावती दिली जाते. विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज समितीच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी दूरध्वनीवर संपर्क साधावा.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)