विद्यार्थ्यांनी जवळून पाहिला चांदोमामा

चिंचवड – श्री साईनाथ शिक्षण संस्था संचालित श्री साईनाथ बालक मंदिरामध्ये रात्रशाळा का विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात चिमुकल्यांनी दुर्बिणीतून चंद्र-तारे पाहण्याचा वेगळाच आनंद अनुभवला.

विद्यार्थी आणि पालकांनी एवढ्या मोठ्या स्वरुपात चंद्र आणि तारे पहिल्यांदाच पाहिले असल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. बालक मंदिरातील मुलांसाठी श्‍वेता कुलकर्णी यांनी दुर्बिण उपलब्ध करुन दिली. या दुर्बिणीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना आकाशातील चंद्र, तारे दाखवून त्याची माहिती सांगितली. रोज आकाशातला चांदोमामा लांबून खूप छोटा दिसतो. परंतु दुर्बिणीतून अगदी जवळून चांदोमामा बघून मुले खूप आनंदीत झाली.

रात्रशाळा कार्यक्रमाला श्‍वेता कुलकर्णी व त्यांच्यासोबत जर्मनीहून आलेल्या त्यांच्या सहकारी ज्युलिया थॉमस उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये डॉ. किर्ती चौधरी यांनी लहान मुलांमधील वाढते मधुमेह व आयुर्वेद या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. धामणे, उपाध्यक्ष प्रा.बेलसरे, दिप्ती धर्माधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका निशा बेलसरे यांनी केले. त्यांना स्वाती कुलकर्णी, प्रज्ञा पाठक, अवनी होनप, मानसी कुंभार, रेवती नाईक, शीतल कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे यांनी सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)