विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयात कार्यशाळा : अभिनव उपक्रम

तळेगाव ढमढेरे- येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ यांच्या वतीने महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत सुरक्षेबाबत धडे गिरवले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व विद्या सहकारी बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे होते.
कार्यशाळेमध्ये भूकंप, महापूर, रस्ते अपघात यासारख्या आपत्तीचा कशा पद्धतीने सामना करावा, याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी तळेगाव दाभाडे येथील एनडीआरएफचे सब इंस्पेक्‍टर लल्लू राम व त्यांचे इतर आठ जवान सहभागी झाले होते. प्रशिक्षणामध्ये कोणत्याही आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्त व्यक्तीला सर्वप्रथम द्यावी लागणारी सीपीआर पद्धती, प्रथमोपचार, आपत्तीच्या काळात जवळ उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे स्ट्रेचर कसे बनवावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. केरळ येथे आलेल्या महापुरामध्ये एनडीआरएफच्या जवानांनी केलेल्या आपत्ती निवारणाचे व्हिडिओदेखील दाखविण्यात आले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी सापांचे विविध प्रकार, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार यावर मार्गदर्शन केले.
यावेळी एकूण 159 विद्यार्थ्यांनी व 20 प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेचे आयोजन व सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ पाटील यांनी केले. प्रा. डॉ. रवींद्र भगत यांनी आभार मानले.

  • बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी…
    अलीकडे बिबट्याचे मनुष्यावरील हल्ले वाढत असून त्यामागील कारणे त्यावर करायचे उपायाविषयी माहिती दिली. बिबट्याचा हल्ला रोखायचा असेल तर घरावर चालू- बंद होणारी लाईट किंवा लाईटची माळ लावली तर तो जवळ येत नाही, असे साधे उपाय देखील सुचविले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)