विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता जनजागृती

पिंपरी – महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून कमला शिक्षण संस्थेचे प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका व चिंचवड प्रवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेच्या जागांवरील झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता जनजागृती अभियान उपक्रम राबविला.

येथील रहिवासियांना महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे यांनी स्वंच्छतेची शपथ दिली. शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता व रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या विविध समस्येबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली. यावेळी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गीता कांबळे, रेल्वे स्थानक प्रमुख ए. एम. नायर, उपप्रमुख अमितकुमार रेल्वे पोलीस फोर्सचे उपनिरीक्षक जे. के. पवार, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार आदी उपस्थित होते.

रेल्वे स्थानका लगतच्या मार्गातून तीन टॅक्‍टर कचरा काढण्यात आला. सूत्रसंचालन चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी केले. मिनल दरेकर यांनी आभार मानले. प्रा. सुवर्णा गायकवाड, प्रा. मनीषा पाटील, प्रा. सुषमा खंडाळे, प्रा. सुशिला भोंग, प्रा. अस्मिता यादव, भावना काकडे, दीपक सोनावणे, बहादूरसिंग यांनी संयोजन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)