विद्यार्थ्यांनी काढला निषेध मोर्चा

दिघी – जम्मू काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बोपखेल येथील जगजीवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला.

मोर्चाच्या सुरुवातीला दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गणेशनगर येथील गणेश मंदिरात रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी जवानांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. जखमी जवानांसाठी तसेच शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. मेणबत्त्या पेटवून मोर्चाला सुरूवात झाली. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधाच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी बोपखेल परिसर दणाणून सोडला. निषेधाचे फलक हातात घेतलेले विद्यार्थी लक्ष वेधत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मोर्चामध्ये शाळेचे अध्यक्ष सय्यद जहीर आलम, नगरसेविका हिराबाई घुले, ऍड मुजीब सय्यद, शाळेच्या प्राचार्या कोमल त्रिपाठी, संचालक मसिरा शेख सय्यद, शर्मिला धावडे, कॅप्टन लवटे, शिरीष चंद्रा, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन घुले, रामदास देवकर, प्रकाश घुले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक देखील या मोर्चात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)