विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप

विश्रांतवाडी – वडगावशेरी येथील श्री. साई प्रतिष्ठानच्या वतीने “एक एक वही मोलाची’ या उपक्रम अंतर्गत लोणकर माध्यमिक विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अनिल वाघमारे, ऍड. राजेंद्र पठारे, विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, श्रीसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी, सीमा जाधव, अर्चना गलांडे, युवराज माने, ललित बुरुड, राजेंद्र शिंदे, सचिन शिंदे तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अनिल वाघमारे, ललित बुरुड, सुमित कांकरिया यांनी विशेष मदत केली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. प्रकाश दळवी यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर तर, डी. डी सोनवणे यांनी व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)