विद्यार्थ्यांना वाहतूक व स्वच्छतेचे धडे- महापौर राहुल जाधव

पिंपरी। परदेशामध्ये मुळांत मुलांना शाळांमधूनच वाहतूक व्यवस्था व स्वच्छतेच्या नियमांबाबत माहिती व शिक्षण दिले जाते त्यामुळे भावी पिढी चांगली घडते त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमधूनच आपण आता वाहतूक स्वच्छतेबदद्दल शिक्षण देण्यास सुरुवात करणार आहोत, अशी माहिती महापौर राहूल जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महापौर राहूल जाधव यांनी आतंरराष्ट्रीय महापौर परिषदेबद्दल माहिती देण्यासाठी शुक्रवारी महापौर कक्षात पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी बोलताना महापौर जाधव म्हणाले की, रशियामधील आर्मेनिया हे शहर अत्यंत स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध शहर आहे. आपल्या शहराकडेही सर्व सोयी सुविधा आहेत मात्र केवळ शिस्त व नियमांचे पालन न केल्यामुळे आपण पिठाडीवर आहोत. परदेशात अगदी शाळेपासूनच मुलांना शिस्त व त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली जाते.त्यामुळे आपणही हा उपक्रम शहरात राबवणार असून शाळांमधूनच मुलांना यासाठी आपण प्रशिक्षण देण्यास सुरुवात करणार आहोत.
या परिषदेविषयी बोलताना महापौर म्हणाले की, रशिया येथील आर्मेनिया शहरातील येरव्हन येथे 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीत ही आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जगातील रशिया, लंडन, फिलीपाईन्स, चीन, टांझानिया, स्पेन, बेल्जियम, बांग्लादेश, श्रीलंका अशा 76 देशांचे महापौर सहभागी झाले होते. भारतातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांचा समावेश होता.
यावेळी महापौर राहूल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड शहरात असणाऱ्या सोयी सुविधा, शहराचे वैशिष्ट्य याबाबत परिषदेत माहिती दिली तसेच 2030 मध्ये शहर राहण्या व काम करण्या योग्य कसे होईल यासाठी शहराला काय करावे लागेल, शहरा समोरील भविष्यातील आव्हाने याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आल्याचे जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)