विद्यार्थ्यांना पोषण आहारात दूध पावडर

मुंबई – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 200 ग्रॅम दूध भूकटीचे एक पाकीट अशी तीन महिन्यांसाठी तीन पाकिटे दिली जाणार आहेत. ही योजना सुरुवातीला 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आणि त्यानंतर कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादकांनी केलेल्या आंदोलनावेळी राज्य सरकारकडून दूध भुकटीचा समावेश पोषण आहारात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला आहे.

कर्नाटकच्या “क्षीर भाग्य योजने’चा अभ्यास करून ही दूध भूकटी वाटपाची योजना राबविण्यात येत आहेत. ही योजना सुरुवातीला 3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आणि त्यानंतर कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. या योजनेचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांची समितीही नेमण्यात आली आहे.

दूध भुकटीपासून दूध कसे तयार करायचे याची माहिती पालकांना देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळांनी “दूध भुकटी वाटप दिवस’ जाहीर करून समिती सदस्यांच्या उपस्थिती प्रत्येक विद्यार्थ्याला दूध भूकटीची तीन पाकिटे द्यावीत, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)