विद्यार्थ्यांना घडवला वृक्ष परिचय 

निगडी – ज्ञानदीप विद्यालय, सौ.अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालय आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे या संस्थेच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून देहुरोड येथील अय्यप्पा टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी वृक्ष परिचय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी करंज, पिंपळ, कडुलिंब, सीताफळ, भोकर ,कांचन, अर्जुन या प्रजातीची 50 रोपे लावण्यात आली. डोंगराळ भागात वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, काय काळजी घेतली पाहीजे, त्यासाठी आळी कश्‍या प्रकारची केली पाहिजे? आदीबाबत माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्राचार्य सूर्यकांत भसे यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी कॉमर्स शाखेचे 25 विद्यार्थी, प्राध्यापक बाळासाहेब पवार, रमेश तिरकुंडे, अरविंद खामकर, प्रशांत भालेकर उपस्थित होते. येथे लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निसर्गराजा मैत्र जीवांचे या संस्थेने घेतली आहे. “निसर्गराजा’ च्या माणिक धर्माधिकारी आणि राहुल घोलप यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलांना शाळेतून टेकडीवर घेऊन येण्यासाठी शंकर सुकाळे यांनी गाडीची व्यवस्था केली होती. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत भालेकर, इमरान तहसीलदार, पांडे, रोहन ढवळे यांनी परिश्रम घेतले. “निसर्गराजा’ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही आठवी कार्यशाळा होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)